इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएल-2023 च्या हंगामासाठी कोची येथे आज झालेल्या लिलावात अनेक खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागली. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याच्यासाठी पंजाब किंग्सने तब्बल 18.50 कोटी मोजले. शिवाय कॅमरॉन ग्रीन 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने, तर बेन स्टोक्सला 16.25 कोटींना चेन्नई सुपर किंगने आपल्या ताफ्यात घेतले.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 16.25 कोटींना खरेदी केले होते, पण यंदा त्याचा विक्रम मोडीत निघाला. सॅम करनने नवा इतिहास घडवला. निकोलस पूरनलाही 16 कोटींना लखनौ सुपरजायंट्सने खरेदी केलं.
संघनिहाय खरेदी झालेले खेळाडू
▪️ चेन्नई सुपर किंग्ज
बेन स्टोक्स – ₹16 कोटी 25 लाख
कायले जेमिन्सन – 1 कोटी
निशांत सिंधू – 60 लाख
अजिंक्य रहाणे – 50 लाख
शेख रशीद – 20 लाख
अजय मंडल – 20 लाख
भगत वर्मा – 20 लाख
▪️ दिल्ली कॅपिटल्स
मुकेश कुमार – 5 कोटी 50 लाख
मनीष पांडे – 2 कोटी 40 लाख
फिल साल्ट – 2 कोटी
इशांत शर्मा – 50 लाख
▪️ गुजरात टायटन्स
शिवम मावी – 6 कोटी
केन विल्यमसन – 2 कोटी
के.एस. भरत – 1 कोटी 20 लाख
ओडियन स्मिथ – 50 लाख
उर्विल पटेल – 20 लाख
▪️ कोलकत्ता नाईट रायडर्स
एन. जगदिशन – 90 लाख
वैभव अरोरा – 60 लाख
सूयश शर्मा – 20 लाख
कुलवंत खेजरोलईया – 20 लाख
▪️ लखनऊ सुपर जायंटस्
निकोलस पुरन – 16 कोटी
डॅनियल सॅम – 75 लाख
अमित मिश्रा – 50 लाख
जयदेव उनाडकट – 50 लाख
रोमारियो शेफर्ड – 50 लाख
यश ठाकूर – 45 लाख
प्रेरक मंकड – 20 लाख
स्वप्निल सिंग – 20 लाख
▪️ मुंबई इंडियन्स
कॅमेरुन ग्रीन – 17 कोटी 50 लाख
जाय रिचर्डसन – 1 कोटी 50 लाख
पियूष चावला – 50 लाख
शम्स मुलानी – 20 लाख
डुअन जॅन्सन – 20 लाख
विष्णू विनोद – 20 लाख
▪️ पंजाब किंग्ज
सॅम कुरन – 18 कोटी 50 लाख
सिकंदर रजा – 50 लाख
हरप्रित भाटिया – 40 लाख
व्ही. करिअप्पा – 20 लाख
शिवम सिंग – 20 लाख
मोहित राठी – 20 लाख
▪️ राजस्थान राॅयल्स
जेसन होल्डर – 5 कोटी 75 लाख
डोनावन फेररीया – 50 लाख
कुणाल राठोड – 20 लाख
▪️ राॅयल चॅलेंजर बंगळुरु
विल जॅक्स – 3 कोटी 20 लाख
रिसे टोपली – 1 कोटी 90 लाख
राजन कुमार – 70 लाख
अविनाश सिंग – 60 लाख
सोनू यादव – 20 लाख
मनोज भांडगे – 20 लाख
हिमांशू शर्मा – 20 लाख
▪️ सनरायजर्स हैदराबाद
हॅरी ब्रुक – 13 कोटी 25 लाख
मयांक अग्रवाल – 8 कोटी 25 लाख
हेन्रिक क्लासेन – 5 कोटी 25 लाख
विव्रांत शर्मा – 2 कोटी 60 लाख
आदिल रशिद – 2 कोटी
मयांक डागर – 1 कोटी 80 लाख
मयांक मार्कंडे – 50 लाख
उपेंद्रसिंग यादव – 25 लाख
नितीशकुमार रेड्डी – 20 लाख
समर्थ व्यास – 20 लाख
सन्वीर सिंग – 20 लाख
अनसोल्ड प्लेयरची यादी
▪️ 2 कोटी बेस प्राईस – रायलो रुसो, टाॅम बॅंटन, जेमी ओव्हर्टन, ख्रिस जाॅर्डन, अॅडम मिल्ने, जिमी निशाम, रसेन व्हॅन डर डुसेन, ट्रेविस हेड
▪️ 1 कोटी 50 लाख – शाकिब अल हसन, रिले मरडिथ, अॅडम झम्पा, शेर्फन रुदरफोर्ड, डेव्हिड मलान,
▪️ 1 कोटी – डॅरेल मिशेल, मोहम्मद नाबी, ज्यो रुट, अकिल हुसेन, मुजीब रहेमान, तबरेज शम्सी