वेगवेगळ्या प्रकारच्या चार्जर्समुळे देशात इलेक्ट्रॉनिक कचरा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता फक्त मोबाईल व वेअरेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी दोन कॉमन चार्जिंग पोर्ट घोषीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोबाइल, स्मार्टफोन व टॅब्लेटसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल, तर वेअरेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉमन पोर्ट असेल. भारतीय स्टँडर्ड ब्युरोने यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट व चार्जर तयार करण्यासाठी क्वालिटी स्टँडर्ड जारी केले आहे.
टाइप-सी पोर्टला मान्यता
केंद्र सरकारने यूएसबी टाइप-सी पोर्टला मान्यता दिली आहे. त्यानुसार, मार्च 2025 नंतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्या यूएसबी टाइप-सी पोर्ट नसलेले स्मार्टफोन व लॅपटॉप विकू शकत नाहीत. यापूर्वी युरोपियन युनियनने 28 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
आयआयटी, कानपूर येथे वेअरेबलसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कॉमन चार्जरसाठी स्टडी केला जात आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर काॅमन वेअरेबल चार्जरला मान्यता दिली जाणार असल्याचे समजते.