Wednesday, February 5, 2025
Homeतंत्रज्ञानTwitter पुन्हा Down!! लॉग इनही होईना; नेमकं कारण काय?

Twitter पुन्हा Down!! लॉग इनही होईना; नेमकं कारण काय?

प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आज म्हणजेच गुरुवारी सकाळपासून डाउन झाले. त्यामुळे हजारो यूजर्सना समस्यांना सामोरे जावे लागले. ट्विटर यूजर्सना लॉग इन करताना अडचण येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिनाभरात दुसऱ्यांदा ट्विटर ढेपाळले आहे.

भारतात, ट्विटर यूजर्सनी वेबसाइटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळत आहेत. ”काहीतरी चूक झाली, पण काळजी करू नका – ही तुमची चूक नाही. रीफ्रेश किंवा लॉग आउट करण्याच्या पर्यायांसह पुन्हा प्रयत्न करूया.” Twitter चे मुख्यपृष्ठ URL https://twitter.com/logout/error वर रीडायरेक्ट होत आहे. आज सकाळी 6.30 वाजल्यापासून ट्विटर डाऊन असल्याची माहिती मिळत आहे . मात्र ट्विटरकडूनही या बिघाडावर काहीच खुलासा न झाल्याने ट्विटर का ढेपाळलं? हे समजू शकलं नाही.

यापूर्वी 11 डिसेंबर रोजी ट्विटर डाउन झाले होते. अनेक यूजर्सनी ट्विटर आउटेजची तक्रार केली होती. बर्‍याच यूजर्सनी तर दावा केला की ते त्यांची टाइमलाइन देखील रीफ्रेश करू शकले नाहीत. तर काही लोकांचे अकाउंट सस्पेंड झाल्याचे दिसत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -