महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी करणाच्या विरोधात काल मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. त्यामुळे महावितरण मधील संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व 32 संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक होऊन तीन ते चार मागण्या मान्य असून व खाजगीकरण होणार नाही. याची ग्वाही दिल्यानंतर राज्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरण कर्मचाऱ्यांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्यामध्ये 32 संघटनांनी सहभाग नोंदवला होता. काल रात्रीपासूनच या संपाला सुरुवात झाली होती. काही ठिकाणी संप केल्यामुळे लाईटही गेली होती. त्यामुळे काही शहरे ग्रामीण भाग अंधारात गेले होते. तर काही व्यवहार ठप्प झाले होते. पण आज दुपारच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महावितरण चे कर्मचारी यांच्यामध्ये बैठक होऊन महावितरण खाजगीकरण होणार नाही तीन ते चार मागण्या राज्य सरकारने मान्य केले आहे. राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत महावितरण खाजगीकरण होऊ देणार नाही.
जो खाजगीकरणाचा घाट घातला आहे तो खाजगी कंपन्यांनी घातला आहे. तिन्ही कंपन्या खाजगीकरण करणार नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी योग्य ते तोडगा काढून रुजू केले जाईल. महावितरण मध्ये राज्य सरकार 50 कोटीची गुंतवणूक करणार आहे. महावितरण कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे राज्यामध्ये हजारो कोटीचे नुकसान झाले आहे.
पण आता देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी बैठक घेऊन 32 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य झाले असून आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. ही बैठक मुंबई येथे मंत्रालयामध्ये पार पडली. त्यामुळे व्यापारी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.