Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडामहिला IPL साठी 5 संघ; पहा कोणकोणत्या शहरांचा समावेश

महिला IPL साठी 5 संघ; पहा कोणकोणत्या शहरांचा समावेश

बीसीसीआयने महिला आयपीएलच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महिला आयपीएलच्या पाचही संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि लखनऊचे संघ असतील. या बोलीतून बीसीसीआयला 4669.99 कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे.

लिलावात अहमदाबादला अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेडने 1289 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने 912.99 कोटी रुपयांना मुंबई फ्रँचायझी विकत घेतली आहे. याशिवाय बंगळुरू संघासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 901 कोटी रुपये, दिल्ली संघासाठी जेएस डब्लू जीएमआर क्रिकेट लि.ने 810 कोटी रुपये, तर लखनऊ संघासाठी कॅपरी ग्लोबल होल्डिंगने 757 कोटी रुपये मोजले.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल कि, आजचा दिवस क्रिकेटमधला ऐतिहासिक दिवस आहे कारण, आजच्या महिला आयपीएल संघाच्या लिलावाने पहिल्या पुरुष आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आम्ही एकूण बोलीमध्ये 4669.99 कोटी रुपये मिळवले. महिला क्रिकेटमधील क्रांतीची सुरुवात झाली आहे. WPL महिला क्रिकेटमध्ये अत्यंत आवश्यक सुधारणा आणेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -