Friday, February 7, 2025
Homeमनोरंजन‘Aashiqui 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स

‘Aashiqui 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स

बॉलिवूडमध्ये ‘आशिकी 2” या चित्रपटाला चाहत्यांनी चांगली पसंती दिली. या चित्रपटात सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ‘आशिकी 3’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चा होत आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘आशिकी 3’ चे शीर्षक दाखवण्यात आले आहे आणि अरिजित सिंहच्या आवाजात ‘तेरे बिन जी लेंगे हम जहर जिंदगी का पी लेंगे हम’ हे गाणे ऐकू येत आहे.

‘आशिकी 3’चं दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत. अनुराग बासू यांच्यासोबत काम करण्यास कार्तिक प्रचंड उत्सुक आहे. ‘आशिकी ३’ मध्ये कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत असणार आहे. मात्र, कार्तिक आर्यनसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत असेल याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चा रंगत होत्या. काही अभिनेत्रींची नावेही समोर आली. मात्र, ती नक्की नव्हती.

आता ‘आशिकी 3’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सारा अली खान असणार असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजेच काय तर सारा अली खान ही कार्तिक आर्यन याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यापूर्वीही कार्तिक आणि सारा यांनी सोबत स्क्रीन शेअर केली. मात्र, यांचा तो चित्रपट फ्लाॅप गेला. चाहते देखील कार्तिक आणि साराला एकत्र पाहण्यास आतुर झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -