केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ही मैदानात उतरणार आहेत. खासदार संजय राऊत 1 मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत.
शिवसंग्राम अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा होणार आहे. यात ते एक मार्चला कोल्हापुरात असतील. एक मार्चला कोल्हापुरात पदाधिकारी बैठकांसह कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. अमित शाह यांनी कोल्हापुरात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपाला संजय राऊत कोल्हापुरातचं मेळावा घेऊनच उत्तर देणार आहेत. त्यामुळे राऊत काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष असेल.