मी म्हणजे केडीसी बँक असे हसन मुश्रीफ वागतायेत. संताजी घोरपडे कारखान्याचे नाव बदलून मुश्रीफ कंपनी करा. मुश्रीफ कुटुंबीय कंपनीने भ्रष्टाचार केलाय.जिल्हा बँकेतून कर्ज घेतले नाही म्हणणाऱ्या मुश्रीफानी 233 कोटीचे कर्ज घेतले.बेकायदेशीर कर्जाची मुदत वाढवून चेअरमन पदाचा गैरवापर केला. पुढच्या 48 तासात आणखीन एक मोठा खुलासा आम्ही करणार आहोत. सात वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एक रुपयाचं कर्ज घेतलेलं नाही म्हणणाऱ्या मुश्रीफांनी जिल्हा बँकेचे नाव बदनाम केलं नाही का? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, संताजी घोरपडे कारखाना हा मुश्रीफांचा कुटुंबाचा आहे. ही त्यांची कुटुंबाची कंपनी आहे. त्यांनी या कारखान्यातून कुटुंबीयांना कर्ज दिले. कर्ज दिले तर दिलेच मग तुम्ही मिडियासमोर खोटे का बोलत आहात, असाही सवाल त्यांनी केला.