Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : गर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टर व एजंट यांना अटक

कोल्हापूर : गर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टर व एजंट यांना अटक

कोल्हापुर जिल्ह्यातील बहुचर्चीत गर्भलिंग चाचणी प्रकरणात आणखी दोघांना अटक करणेत राधानगरी पोलिसांना यश आले असुन संजय आप्पासो गोंधळी रा. सुळकूड, ता. कागल व विठ्ठल हिंदुराव निकम रा. सावर्डे, दुमाला, ता. करवीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सदर गुन्ह्यात १८ आरोपी निष्पन्न झालेले असून त्यातील १२ आरोपी अटक केले आहेत व आरोपी गजेंद्र उर्फ सनि बापुसो कुसाळे रा. शिरसे ता. राधानगरी, ओंकार कराळे रा. सडोली ता. करवीर, राजेंद्र यादव रा. कारभारवाडी. ता. करवीर, डॉ. प्रसाद ढेंगे रा. मडिलगे बु. ता. भुदरगड हे अद्याप फरारी आहेत.

तपासादरम्यान आरोपी संजय आप्पासो गोंधळी रा सुळकूड, ता. कागल याने मिरज व कागल तालुक्यातील महिला पेशन्ट गर्भलिंग चाचणी करीता यापुर्वी अटकेत असणारा आरोपी श्रीमंत पाटील यांचेकडे पाठविलेचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी विठ्ठल हिंदुराव निकम हा १२ वी पर्यंत शिकलेला असुन तो यापूर्वी आर्थोपेडीक हॉस्पीटल मध्ये कंपाऊड म्हणून नोकरीस होता व सध्या तो पन्हाळा तालुक्यात वैद्यकिय व्यवसाय करत आहे. त्याने यापुर्वी अटकेत असणारा आरोपी राजेंद्र यादव याचेकरवी महिलांची गर्भलिंग चाचणी करुन जे स्त्री अर्भक असलेल्या महिलांचे घरी जावून त्यांचा गर्भपात घडवून आणलेचे तपासात निष्पण्ण झाले आहे. या दोन्हीही आरोपींना न्यायालयात हजर केले असता मंगळवार दि २८ फेब्रुवारी अखेर सहा दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उप विभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, शहर विभाग अति कार्यभार शाहुवाडी विभाग कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. स्वाती गायकवाड, पोलीस उप निरीक्षक विजयसिंह घाडगे, पोहेकॉ के. डी. लोकरे, पो हेकॉ बजरंग पाटील, पो हेकॉ सुरेश मेटील, पो.हे.काॅ सचीन पारखे, गजानन गुरव, पो. कॉ. रोहीत खाडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -