Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील बारावीचा गणिताचा पेपर फुटला!

राज्यातील बारावीचा गणिताचा पेपर फुटला!

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी बोर्डाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, यासाठी बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले आहे. मात्र परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुका काही कमी होताना दिसत नाहीत. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच प्रश्नपत्रिकेत चक्क उत्तर छापून आल्यानंतर राज्यभरात चर्चा झाली होती. आता बुलढाणा येथून धक्कादायक बाब समोर आली आहे. बुलढाण्यात बारावी परीक्षे दरम्यान आज गणित विषयाचा पेपर फुटला आहे. या पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे कृत्य नेमके कुणी आणि कसे केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पेपरफुटीनंतर आता बोर्ड याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -