फुलेवाडी दत्त मंदिर परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्याने बुधवारी रात्री फोडली. कपड्याच्या दुकानातील १० हजार रुपये आणि कपडे व एका दुकानातील पाच हजाराची रोकड असा पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. तर एका ठिकाणी केवळ चोरीचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आदित्य संजय निळकंठ यांचे इलेक्ट्रीक दुकान मेन रोडवर आहे. त्याला लागून गणेश संजय लोहार (वय ४० रा. पुलाची शिरोली,ता.हातकणंगले) यांचे कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दोन्ही दुकानाचे पाठीमागील शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. इलेक्ट्रीक दुकानातील कॅश काऊंटरमधील ५ हजार रुपये लंपास केले.
कोल्हापूरात तीन ठिकाणी घरफोडी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -