लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबाच्या डोंगरावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत क्षेत्र यात्रा पार पडली. महाराष्ट्र कर्नाटक सह आजूबाजूच्या राज्यातून अंदाजे १५ लाख भाविक उपस्थित राहिल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सांगण्यात आले आहे.जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असलेल्या यात्रेत काही ठिकाणी अपघात देखील घडली यामध्ये दोघांना आपले प्राण गमवावे लागले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
चैत्र यात्रेला वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात यंदा देखील क्षेत्र असलेला मोठ्या प्रमाणात भाविक आल्यामुळे प्रशासनावर देखील मोठा ताण निर्माण झाला होता. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भक्त हे आदल्या दिवशी पासूनच डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथून आलेल्या २० वर्षीय प्रमोद धनाजी सावंत या भाविकाचा सकाळच्या सुमारास दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुंबई भांडुप येथून आलेले ५९ वर्षीय भाविक संजय दत्तात्रय शिंदे यांचा देखील हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी जमली होती. यातच मित्र आणि नातेवाईकांसोबत प्रमोद सावंत यात्रेसाठी डोंगरावर पोहोचला होता दरम्यान हा तरुण काल पहाटे पावणेसहाच्या सुमारास दक्षिण बाजूच्या डोंगर उतारावर गेला आणि अंधारात अंदाज न आल्याने पाय घसरुन सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला. दरम्यान तत्काळ त्याला दरीतून बाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.