तनवडी येथील शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय 23) या तरुण जवानाने रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्तेचे कारण अजूनही कळू शकली नाही. या घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसात दिली आहे.
सध्या राजस्थान येथील कोठा येथे कार्यरत असणाऱ्या शिवानंद आरबोळे हा पंधरा दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आले होते. रविवारी सकाळी ते आपल्या कुटुंबासोबत शेताकडे गेले होते. शेतातच जेवण करून आंघोळीसाठी घरी जातो असे सांगून ते घरी परत आले होते. बराच वेळाने त्यांचा मृतदेह घरातील तुळीला लटकल्याचा लोकांना आढळून आला. नायलॉनच्य़ा दोरीच्या साहय्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिक लोकांनी त्यांना तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी जवान शिवानंद यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात झाली आहे.