Friday, February 7, 2025
Homeराजकीय घडामोडीराजारामच्या उमेदवार अपात्रतेवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल!

राजारामच्या उमेदवार अपात्रतेवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल!

राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आले आहे. या निर्णया विरोधात गेल्याने राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी उच्च न्यायालयात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कारण 12 एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, प्रादेशिक साखर आयुक्तांच्या मध्यरात्रीच्या आदेशावर आज सतेज पाटलांनी हल्लाबोल केला आहे. मध्यरात्री आपात्रतेची नोटीस काढली जाते, यावरून महाडिक भ्याले अशी टीका महाडिकांवर केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या दबावाने शासकीय आयुक्तांनी मध्यरात्री निकाल दिला आहे. पण आम्ही लढा बंद नाही केलेला. हा
हा लढा सुरूच राहणार, आमचे अजून 50 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली. तसेच जाणूनबुजून सभासदांचे ऊस तोडले नाहीत असा आरोपही त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -