Wednesday, January 14, 2026
Homeकोल्हापूरKolhapur: मलकापूर परिसरात गारासहपाऊस

Kolhapur: मलकापूर परिसरात गारासहपाऊस

मलकापूर परिसरात वीजेचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दिवसभर तीव्र उष्म्याने हैराण झालेल्यां नागरीकांना सायंकाळी झालेल्या या वळीव पावसामुळे गारवा मिळाला. मात्र, अचानक झालेल्या या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली. शेतकरी बांधवांनी शेतात वाळत घातलेले मक्याचे वाळवण भिजले. वादळी वाऱ्यामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले.

सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस बरसत होता. दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. मोबाईलचे ही नेटवर्क गायब झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. गारांसह पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा, नागरिक सुखावले. मात्र आंबा, काजू, करवंद, जांभूळ, रातांबी आदीसह डोंगरच्या काळीमैना यांचे नुकसान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -