कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आवारात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सीपीआर रुग्णालयाच्या परिसरामध्ये एकच खळबळ माजली असून हि अर्भके आली कुठून याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीपीआर रुग्णालयामधील शवविच्छेदन गृहाबाहेरील पत्र्याच्या शेडजवळ दोन मानवी अर्भक आढळली. या दोन अर्भकांची कुत्र्यांनी लचके तोडल्याचे निदर्शनास आल्यावर एकच खळबळ माजली.ही अर्भके या परिसरात कुठुन आली याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय कचऱ्यातून कुत्र्यांनी दोन्ही अर्भक आणली असण्याचा संशय कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच ही अर्भक बाहेरून कोणी आणून टाकली का याबाबतही शोध पोलीसांकडून सुरू आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.