कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर पन्हाळा तालुक्यातील खेरीवडे फाट्याजवळ महिंद्रा बोलेरो पिकअपने चुकीच्या दिशेने येवून एसटीला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातामध्ये सातजण जखमी झाले. याची नोंद कळे पोलीस ठाण्यात झाली आहे.
एसटी चालक शशिकांत भगवान कांबळे (वय ३९, रा. वाकरे ता.करवीर) हे एसटी बस (एमएच १४ बीटी ३४०५) मधून गगनबावड्याकडे निघाले होते. याचवेळी कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपचा क्र. (एमएच ४३ बीएक्स ९७७२) चालक तात्यासो आनंदा पवार (वय ३८ रा. नाडे ता.पाटण, जि. सातारा) याने वेगामध्ये चुकीच्या दिशेने येवून एसटीला समोरुन जोराची धडक दिली. यामध्ये एसटीचे चाक तुटून टायर फुटला तर केबीनचे नुकसान झाले.
ही धडक इतक्या जोराची होती की, बोलेरो पिकअपच्या केबीनचाही चक्काचूर झाला होता. जखमी झालेल्या पिकअप चालकाला उपचारासाठी नागरिकांनी सीपीआरला हलवले. यामध्ये एसटी बसचालक शशिकांत भगवान कांबळे (रा.वाकरे ता.करवीर), वाहक वनिता अमर पाटील (रा.पोहाळे तर्फ बोरगाव ता.पन्हाळा), प्रवासी पांडुरंग तुकाराम पाटील (रा. तळये बु. ता. गगनबावडा), उमेश बाळकृष्ण सावंत (रा. तिसंगी ता. गगनबावडा), निखिल शिवाजी पडवळ (रा. खोकुर्लेपैकी पडवळवाडी ता.गगनबावडा), संदीप शिवाजी बुवा (रा.चव्हाणवाडी ता.पन्हाळा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर पिकअपची एसटी बसला धडक : ७ जण जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -