,कळंबा (ता. करवीर) येथील आंबेडकरनगरातील अवधूत अजित डाकवे (वय २४ मूळ रा. डाकवे गल्ली मंगळवार पेठ) याने लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेतला. किरकोळ वादातून त्याने अगोदर मोबाइलवर भावपूर्ण श्रद्धांजली असा स्वत:चा स्टेटस ठेवला. तो त्याच्या मित्रांनी व भावांनी पाहताच लगेच सर्व जण त्याच्याकडे धावले. परंतु तोपर्यंत त्याने गळफास लावून घेतला होता. बुधवारी (दि. ३) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार
घडला.
मित्र व शेजाऱ्यांनी गळफास सोडवून अवधूतला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आईला मोठा धक्का बसला. अवधूतच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. आईने परिचारिका म्हणून काम करून त्याला कष्टातून वाढवले होते. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
मोबाईल वर वाहिली श्रद्धांजली; स्टेटस पाहून मित्र भावासह सर्व जन धावले, तो पर्यंत त्याने संपवले जीवन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -