ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर केरळ पाठोपाठ आता तामिळनाडूतील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनी The kerala story बंदी घातली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि चित्रपटाला मिळालेला कमी प्रतिसाद यामुळे हे पाऊल उचलल्याचे तामिळनाडूतील थिएटर मालकांचे म्हणणे आहे. मात्र ‘एनटीके’ पक्षाच्या तीव्र विरोधामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे.
तामिळनाडूतील मल्टिप्लेक्स चित्रपटगृह मालकांन प्रदर्शन थांबवले तामिळनाडूत चेन्नईसह विविध शहरांमध्ये ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजला विरोध केला जात होता. ‘नाम तमिझार काची’ (एनटीके) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये गोंधळ घातला. ‘द केरळ स्टोरी’ मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्याचा दावा करून ‘एनटीके’ ने निषेध केला. पुद्दुचेरी आणि तामिळनाडू सरकारने त्याच्या स्क्रीनिंगवर बंदी घालावी, अशी मागणी केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येवू नये, यासाठी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले आहे., अशी माहिती तामिळनाडूतील मल्टिप्लेक्स चित्रपटगृह मालकांनी आज (दि.७) दिली.
‘द केरळ स्टोरी’चा टिझर रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. केरळ राज्यातील ३२ हजार मुली बेपत्ता झाल्या आणि नंतर ISIS या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे चित्रण या चित्रपटात आहे. केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
‘द केरळ स्टोरी’चे स्क्रीनिंग वर बंदी… ; मल्टिप्लेक्स चित्रपटगृह मालकांन प्रदर्शन थांबवले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -