मित्रांनो आपल्या घरातील प्रत्येकाच्या देवघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या आपणाला पाहायला मिळतातच आणि देवघरातील देवी देवतांची आपण विधिवत पूजा करीत असतो. तसेच पूजा करून झाल्यानंतर गोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवतो. घरातील महिला या सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा ही करतच असतात. तसेच तुळशीला जलदेखील अर्पण करीत असतात. जेणेकरून आपल्या कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारची बाधा अडचण येऊ नये. तसेच प्रत्येक व्यक्तींना यश प्राप्त होईल.
घरातील महिला ही लक्ष्मी मानली गेलेली आहे. ती आपल्या कुटुंबीयांची अगदी योग्य ती काळजी देखील घेत असते. परिवारासाठी ती काहीही करायला तयार देखील असते. तर आज मी तुम्हाला असे काही दोन मंत्र सांगणार आहे हे दोन मंत्र घरातील महिलांनी जर बोलले तर यामुळे कुटुंबातील सर्वांचीच प्रगती होईल. तसेच सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या कुटुंबीयांवर होणार नाही. तसेच भाग्यदेखील बदलणार आहे.
हा जो मंत्र आहे हा मंत्र खूपच प्रभावशाली असा आहे आणि घरातील महिलांनी स्वयंपाक करताना किंवा कोणतेही काम करताना या मंत्राचा जप केला तरीही चालतो. याला कोणतेही वेळेचे बंधन अजिबात नाही. तर महिलांनी जर स्वयंपाक करताना हा जरी मंत्र बोलला तर तिने बनवलेले जेवण व्यक्ती खात आहे त्यांच्यावर सकारात्मक ऊर्जा नक्कीच संचारेल.
तर हे जे दोन मंत्र आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक देखील मंत्र म्हणू शकता. परंतु पहिले सात ते आठ दिवस तुम्ही या दोन्ही मंत्राचा जप करायचा आहे आणि सात ते आठ दिवसानंतर तुम्हाला जो मंत्र प्रभावी आहे असे वाटते त्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. परंतु पहिले आठ दिवस तुम्ही या दोन्ही मंत्राचा जप करायचा आहे. तर तो प्रभावशाली मंत्र त्यातील पहिला मंत्र म्हणजेच
श्री स्वामी समर्थ
हा स्वामी समर्थांचा मंत्र तुम्ही अवश्य कोणतेही काम करीत असताना किंवा स्वयंपाक करीत असताना केला तरीही चालतो.
तसेच दुसरा मंत्र म्हणजे
ओम नमो नारायणा
तर या मंत्राचा जप देखील आपणाला खूपच प्रभावशाली असा ठरणार आहे. या मंत्राचा जप घरातील महिलांनी जर केला तर कुटुंबांची नक्कीच प्रगती होईल. त्यांचे भाग्य उजळेल. अगदी मनोभावे, श्रद्धेने हळुवारपणे तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.