Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरशाहू मिलमध्ये दोन दिवस जॉब फेअरचे आयोजन; 'या' विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार

शाहू मिलमध्ये दोन दिवस जॉब फेअरचे आयोजन; ‘या’ विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार

पदवी व पदविका घेऊन कॉलेज व युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी जॉबफेअरचे आयोजन 13 आणि 14 मे 2023 रोजी करण्यात आले आहे.लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ व कृतज्ञता पर्व अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून आयोजित आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या प्रयत्नातून शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी करियर संधी मार्गदर्शन अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचे डॉ. संजय दाभोळे यांची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये 350 विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांसाठी जॉबफेअरचे आयोजन
कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव रणजीत नार्वेकर, खजिनदार राहुल मेंच, संचालक मंदार पेटकर,आदिनाथ पाटील, सूर्यकांत दोडमिसे, धवल चौगुले, मनीष रजगोळकर, प्रसना कुलकर्णी उपस्थित होते. आज10 मे रोजी न्यू ट्रेंड्स इन नेटवर्किंग, दुपारी 2 वाजता आयडिया टू आयपीओ, त्याचबरोबर 12 मे रोजी कोल्हापुरातील आयटी वाढीबद्दल चर्चा करण्यासाठी एक सत्र आयोजित केले आहे. दरम्यान, पदवी व पदविका घेऊन कॉलेज व युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी जॉबफेअरचे आयोजन 13 आणि 14 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ अभियंता शाखेच्या जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आयटी असोसिएशनने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -