Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानअरे वा! ‘पोको’ने केला परवडणाऱ्या किमतीत वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन लॉन्च, वाचा या फोनची...

अरे वा! ‘पोको’ने केला परवडणाऱ्या किमतीत वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन लॉन्च, वाचा या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये

सध्या स्मार्टफोनचे युग असून प्रत्येकाला स्मार्टफोन शिवाय जगणे शक्यच नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्मार्टफोनच्या बाबतीत विचार केला तर अनेक स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगभरात असून त्या त्या कंपनीची अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे स्मार्टफोन आहेत.

याबाबत विचार केला तर प्रत्येक जण आपल्याला परवडणाऱ्या किमतीत आणि खूप चांगले जबरदस्त वैशिष्ट्य असणारे मोबाईलच्या शोधात असतात. या पद्धतीचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने अशा कमीत कमी किमतीत आणि भरपूर वैशिष्ट्ये असणाऱ्या पोको या चिनी टेक कंपनीच्या स्मार्टफोन बद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.पोकोने भारतात केला लॉन्च पोको F5 स्मार्टफोन

पोको या स्मार्टफोन कंपनीने नऊ मे रोजी भारतामध्ये पोको F5 स्मार्टफोन लॉन्च केला असून ओव्हर हीटिंग टाळता यावी याकरिता ऍडव्हान्स व्हीसी कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेले हे एफ सिरीज मधील 5जी स्मार्टफोन कंपनीने सादर केले आहेत.

हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असून त्यातील ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट हे तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. याची डिझाईन फ्लॅट फ्रेम पद्धतीची असून यामध्ये बारा बीट अल्ट्रा स्लिम बेसल डिस्प्ले सेगमेंट दाखवतो. कंपनी या मोबाईल मध्ये दोन वर्षासाठी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स आणि तीन वर्षासाठी सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.या स्मार्टफोनची रॅम आणि इतर वैशिष्ट्ये

पोको F5 हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे त्यातील पहिला प्रकार म्हणजे आठ जीबी रॅम अधिक 256 जीबी स्टोरेज आणि दुसरा म्हणजे बारा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असे ते दोन प्रकार आहेत. या फोनच्या डिस्प्ले चा विचार केला तर WQHD+ रिझोल्युशनसह 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले असून 120Hz चा रिफ्रेश रेट सह 1000 nits चा पीक ब्राईटनेस ऑफर करतो. या स्मार्टफोनच्या कॅमेराचा विचार केला तर फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स आणि आठ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा आणि दोन मेगापिक्सल चा मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी वॉटर नॉट डिझाईन सोबत 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनमध्ये पावर बॅकअप साठी 5000mAh बॅटरी असून जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याबद्दल कंपनीचा दावा आहे की या फोनची बॅटरी बारा मिनिटात 50 टक्के चार्ज होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -