Friday, February 7, 2025
Homeअध्यात्मवास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावा 'या' रंगांचे पडदे!

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावा ‘या’ रंगांचे पडदे!

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती पाहायला मिळते. म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार अनेक जण आता अलीकडे घरांची रचना करीत आहे जेणेकरून आपल्या घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी देखील निर्माण होणार नाहीत. तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला तर आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो. तसेच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात आणि त्यामुळे पैसा खर्च होत राहतो.

तसेच बऱ्याच घरांमध्ये वास्तुदोषामुळे कटकट, भांडणे, वादविवाद हे सुरूच असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. ज्या घरांमध्ये शांतता असेल त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करते वास्तुदोशांचे अनेक परिणाम अनेक जणांना भोगावे लागतात. हे परिणाम खूपच विपरीत देखील असतात.

तर वास्तुशास्त्रानुसार जर आपण अभ्यास करून आपल्या घराची रचना आणि कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात याविषयी माहिती जाणून घेऊनच त्या त्या ठिकाणी त्या त्या वस्तू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये वस्तूदोष निर्माण होणार नाही. तर आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कोणत्या रंगाचे पडदे आपण वापरायचे आहेत याविषयी सविस्तर सांगणार आहे.

मित्रांनो तसे तर प्रत्येक जण हा आपले घर सुंदर दिसण्यासाठी काही ना काही करीतच असतात. म्हणजेच अनेक वेगवेगळ्या वस्तू, शोभेच्या वस्तू ठेवत असतात. तर बरेच जण हे आपल्या घरामध्ये आवडीच्या कलरचे पडदे लावत असतात. परंतु मित्रांनो वास्तुशास्त्रांमध्ये कोणत्या रंगाचे पडदे लावल्याने आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल, शांतता लाभेल याविषयी पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊयात घरांमध्ये नेमक्या कोणत्या रंगाचे पडदे  लावावे ते.

तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही कारणावरून वादविवाद, भांडणतंटे असतील म्हणजे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण असेल म्हणजेच एकमेकांचे म्हणणे एकमेकांना पटत नसेल म्हणजेच मतभेदाचे वातावरण असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचा पडदा लावायचा आहे. यामुळे मित्रांनो तुमच्या घरामध्ये सर्वजण एकोप्याने राहतील आणि सर्व काही मतभेद दूर होतील.

तसेच मित्रांनो जर तुम्हाला काही ना काही अडचणी सतत येत असतील म्हणजेच कामामध्ये सतत काही ना काही समस्या येत असेल म्हणजे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही आपल्या घराच्या पश्चिमेकडील दारात पांढऱ्या रंगाचा पडदा लावायचा आहे. यामुळे मित्रांनो ज्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील या समस्यांचा सामना तुम्हाला अजिबात करावा लागणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल.

तसेच जर तुम्हाला आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी, शांतता नांदावी आपल्या घरातील वातावरण हे कायमच आनंदाचे असावे, कुटुंब आपली सुखी असावी असे जर वाटत असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये हिरव्या रंगाचे पडदे वापरायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या घरामध्ये जर पडदे लावणार असाल तर वरील सांगितल्याप्रमाणे या पडद्यांचा म्हणजेच या रंगाच्या पडद्यांचा तुम्ही वापर करायचा आहे. यामुळे आपले जीवन हे सुखी होईल आणि आपले कुटुंब देखील सुखी राहणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष आपल्याला सामना देखील करावा लागणार नाही.

नेहमी मतभेदाचे वातावरण असेल तर अशा स्थितीत घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचा पडदा लावावा
जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुमच्या घराच्या पश्चिमेकडील दारात पांढऱ्या रंगाचे पडदे लावा घरामध्ये हिरवे पडदे लावल्याने समृद्धी येते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -