Wednesday, December 25, 2024
Homeब्रेकिंगवसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या; प्रशासनात खळबळ

वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या; प्रशासनात खळबळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अकोला शहराच्या शास्त्रीनगर परिसरातील वसतिगृहात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी जळगावच्या जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील रहिवासी असून ती अकोल्यातील वसतिगृहात राहायला होती. रविवारी १० वाजले तरीही ही मुलगी जेवण्यासाठी आली नाही. यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला फोन केला. परंतु, समोरून कोणताही प्रतिसाद आला नाही. यानंतर स्वयंपाक करणारी महिला आणि तिच्या मैत्रीणी तिला बोलवण्यासाठी तिच्या रुमवर पोहचल्या. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने तिच्या मैत्रिणींनी तिला बाहेरून आवाज दिला. पण तरीही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग काही तरुणींनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना संबंधित मुलगी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली.

या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुलीच्या आत्महत्येच्या कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -