Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगमोठा युट्युबबर अपघातात मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक!

मोठा युट्युबबर अपघातात मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक!



छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल याचा आज लभंडीजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. अनियंत्रित भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात युट्यूबर देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. अवघ्या 21 व्या वर्षी देवराज पटेलने आपले प्राण गमावले आहेत.

‘दिल से बुरा लगता है’ या चित्रपटाने करोडो लोकांमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा देवराज पटेल आज आपल्याला सोडून गेला. या तरुण वयात आश्चर्यकारक प्रतिभा गमावणं खूप दुःखदायक आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती, असं ट्विट छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -