आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात जाहीर केलं जाणार आहे. पण त्याआधीच स्पर्धेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेच्या सेमीफायनल कुठे खेळवली जाणार याबाबत मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेमीफायनलचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवले जाण्याची शक्यता कमी आहे. अशात सेमीफायनलचे सामने कोणत्या स्टेडिअममध्ये खेळवले जाणार याची माहिती समोर आली आहे.
या ठिकाणी होणार सेमीफानयल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील एक सेमीफायनल मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये तर दुसरी सेमीफायनल ईडन गार्डन्समध्ये खेळवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होईल. गतविजेत्या इंग्लंड आणि रनरअप न्यूझीलंड दरम्यान स्पर्धेतला सलामीचा सामना खेळवला जाईल. तर टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला 8 ऑक्टोबरपासून चेन्नईत सुरुवात होण्याची शक्यता आहे. स्पर्धेतला हायव्होल्टेज सामना असलेला भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 15 ऑक्टोबरदरम्यान अहमदाबादच्या मोदी स्टेडिअममध्ये खेळवला जाईल.
10 संघांमध्ये 48 सामने
एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत एकूण 10 संघांचा समावेश असून त्यांच्यात 48 सामने रंगतील. यजमान भारतासह, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे आठ संघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरीत दोन संघ क्वालीफाय राऊंडमधून प्रवेश करतील. झिम्ब्बाब्वेमध्ये क्वालिफाय राऊंड सुरु असून यात वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, झिम्बाब्वे यातून दोन संघ निवडले जातील.
उरले काही तास! विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर होणार, या दोन शहरात सेमीफायनल?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -