ताजी बातमी ऑनलाईन टीम
शहरातील सर्वात प्राचीन असलेले नदीवेस नाका येथील मरगुबाई मंदिराचे बांधकाम हे गेल्या एक ते दीड वर्षापासून रखडले आहे. ते त्वरित बांधकाम सुरु होणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण गेल्या मंगळवार दि. २० जूनपासून देवीची यात्रा सुरु झाली असून शहरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
बांधकाम रखडल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. सदर बांधकाम त्वरित सुरू केले नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदन प्रमोद बचाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदिप ठेंगल यांना देण्यात आले. यावेळी सुशांत कोटगी, विनायक सासणे, महेश बेडगे, राजू खामकर, किरण सुर्यवंशी, बाजीराव सासणे, प्रसाद काळे, योगेश सोनुले आदि उपस्थित होते.
इचलकरंजी ; मरगुबाई मंदिर बांधकाम त्वरीत चालू न केल्यास आंदोलन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -