ताजी बातमी ऑनलाईन टीम
पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीसंबंधी गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवार यांनी उत्तर देताना फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं असून माझ्यामुळे त्यांच्या तोंडी अर्ध सत्य आलं असून, उर्वरितही लवकर बोलायला लावू असा इशारा दिला आहे.
“मला अतिशय आनंद आहे की, शेवटी शरद पवारांना सत्य सांगावं लागलं. मी जी गुगली टाकली त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आलं आहे. पण ते सत्य अर्धच आहे. अजून उरलेलं सत्यही मी बाहेर काढीन. पण त्यांच्या गुगलीमुळे माझ्या जागी त्यांचे पुतणे अजित पवारच क्लीन बोल्ड झाले. त्यांनी स्वत:च्या पुतण्याचीच विकेट काढली आहे. पण हरकत नाही, उरलेलं सत्यही लवकरच बाहेर येईल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“आमची बैठक झाली आणि दोन दिवसांनी भूमिका बदलली असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी तर जाहीर बोललो होतो की, तुम्हाला सरकार बनवण्यास लोक कमी पडत असतील तर बाहेरुन राष्ट्रवादी पाठिंबा देईल. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी हे सांगितलं होतं. नंतर द्यायची वेळ आली नाही. त्यांचं फार कौतुक होतं असं काही नाही. त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांमध्ये अंतर कसं पडेल याची काळजी घ्यायची होती. तो त्या काळचा प्रश्न होता,” असं शरद पवारांनी सांगितलं.
गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -