Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगआरक्षण मिळत नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही’, पंकजा मुंडे यांचा एल्गार

आरक्षण मिळत नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही’, पंकजा मुंडे यांचा एल्गार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सूचक वक्तव्य केलं. तसेच मराठा आरक्षणासाठी आग्रहाची भूमिका मांडली. दुसरीकडे त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

“राजेंद्र म्हस्के म्हणाले, ताई फेटा बांधा. मी म्हणाले, मी फेटा बांधणार नाही. कधीपर्यंत फेटा बांधणार नाही ते माहिती आहे का तुम्हाला? मराठा आरक्षणाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही. बावनकुळे साहेब, ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितलं होतं, मी गळ्यात कोणत्याही फुलाचा हार घालणार नाही. मग ते आरक्षण वाचलं. मग लोकांना दम पडला नाही. पण मी फेटा बांधणार नाही”, असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.

विखे पाटील म्हणतात, ‘भावनिक मुद्दा करुन…’
“आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत नाहीय. आर्थिकदृष्ट्या ज्या ज्या माध्यमातून त्या समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणता येईल, त्यांना शिकवता येईल. त्यांची व्यवस्था करता येईल, ते सगळे प्रयत्न राज्य सरकार आज करतंय. त्यामुळे आरक्षण मिळायलाच पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण त्यासाठी भावनिक मुद्दा करुन काही साध्य होणार नाही. सरकार प्रयत्न करत आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -