हिंदू कॅलेंडरनुसार, भानु सप्तमी (Bhanu Saptami 2023) व्रत दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या सप्तमीला पाळले जाते. या व्रताचे विशेष पौराणिक महत्त्व सांगण्यात आले आहे. यावेळी श्रावण महिन्यात 9 जुलै रोजी कृष्ण पक्षातील भानु सप्तमी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी कालाष्टमी देखील आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधीकच वाढले आहे. भानु सप्तमीला रथ सप्तमी असेही म्हणतात.
सूर्यदेवाच्या उपासनेला आहे महत्त्व
भानु सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. भानु सप्तमी तिथीला सूर्यदेवाची आराधना केल्याने व्यक्तीला जीवनातील कोणत्याही मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळते, अशी पौराणिक मान्यता आहे. याशिवाय ज्या लोकांच्या आरोह कुंडलीत सूर्य कमजोर आहे, त्यांनी भानु सप्तमी व्रत केल्यास कुंडलीतील सूर्य बलवान होतो.
रथ सप्तमी व्रताचे धार्मिक महत्त्व
रथ सप्तमीला सूर्य सप्तमी, अचला सप्तमी, सूर्यरथ सप्तमी, भानु सप्तमी आणि आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. कुंडलीत सूर्य बलवान असताना हे व्रत पाळल्यास करिअर आणि व्यवसायात यश मिळते. तसेच उत्पन्नात वाढ, वय, आनंद आणि नशिबात वाढ होते. इच्छित नोकरीही मिळते.
भानु सप्तमीला अशी पूजा करा
9 जुलैला ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
सूर्योदयाबरोबर सूर्यदेवाला नमस्कार करून उपवासाचे व्रत करावे.
वाहत्या पाण्याच्या प्रवाहात काळे तीळ वाहावेत.
पाण्यात तांदूळ, काळे तीळ, रोळी आणि दुर्वा मिसळून सूर्यदेवाला जल अर्पण करा.
सूर्यदेवाची पूजा करताना या मंत्रांचा जप करा
एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते ।
अनुकम्पय मां देवी गृहाणार्घ्यं दिवाकर।।
ॐ भूर्भुवः स्वःतत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्यः धीमहि धियो यो नः प्रचोदयात्॥