Sunday, December 22, 2024
HomeBlogयंदा आठ आठवड्यांचा असणार श्रावण महिना!

यंदा आठ आठवड्यांचा असणार श्रावण महिना!

श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्वाचे व्रत म्हणजे श्रावण सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. १८ जुलै २०२३ रोजी श्रावण सुरू होत आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना १८ T १८ जुलै २०२३ पासून सुरू होत असून १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण ५९ दिवस श्रावण महिन्याचा लाभ भाविकांना मिळणार असून ते मनोभावे शिवभक्ती करु शकतात. हा शुभ संयोग तब्बल १९ वर्षांनंतर घडल्याचे मिरवणुका सांगितले जात आहे. यंदा अधिक मास आल्या निज श्रावण सोमवारची तिथी पुढे ढकलली गेली आहे.

दोन महिन्याचा श्रावण महिना वास्तविक वैदिक दिनदर्शिकेत सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना ३५४ दिवसांचा असतो आणि सौर महिना ३६५ दिवसांचा असतो. दोघांमध्ये सुमारे ११ दिवसांचा फरक असतो आणि तिसऱ्या वर्षी हा फरक ३३ दिवसांचा
१९ वर्षांनंतर संयोग; ५९ दिवस भाविकांना लाभ
होतो, याला अधिक मास म्हणतात. अशा परिस्थितीत यंदा श्रावण दोन महिने चालणार आहे. अधिक महिना आणि निज महिन्याचे एकूण ८ श्रावण सोमवार पहिला सोमवार- २४ जुलै, दुसरा सोमवार- ३१ जुलै, तिसरा सोमबार ७ ऑगस्ट, चौथा सोमवार १४ ऑगस्ट, पाचवा सोमवार – २१ ऑगस्ट, सहावा सोमवार २८ ऑगस्ट, सातवा सोमवार- ४ सप्टेंबर, आठवा सोमवार ११ सप्टेंबर.सन २०२३ मध्ये अधिक महिना आल्याने अधिक मास वगळता पहिला निज श्रावणी सोमवार २१ ऑगस्ट २०२३ रोजी आहे.

यानंतर २८ ऑगस्ट २०२३ रोजी दुसरा श्रावणी सोमवार, ४ सप्टेंबर २०२३ रोजी तिसरा श्रावणी सोमवार, तर ११ सप्टेंबर २०२३ रोजी चौथा श्रावणी सोमवार असणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. पाचवा श्रावणी सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.

यंदा अधिक मास आहे. श्रावण मास अधिक असल्याने श्रावण अधिक मासात आलेले सोमवार न करता निज श्रावण मासातील सोमवार करावे. श्रावण निज मासात पहिला श्रावण सोमवार २१ ऑगस्ट रोजी असून, यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आहे. यादिवशी चित्रा नक्षत्र राहील तसेच चंद्र तूळ राशीत संक्रमण करेल. याच दिवशी शुभ योगा नागपंचमी देखील साजरी केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -