Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीविविध समस्यांमुळे यंत्रमागधारक हवालदिल!

विविध समस्यांमुळे यंत्रमागधारक हवालदिल!

कापूस, सूत दरात होत असलेला चढउतार, कापडाला म्हणावी तशी मागणी नाही, वीज दरवाढ, जागतिक मंदी अशा विविध कारणामुळे वस्त्रोद्योग अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. साध्या यंत्रमागधारकाबरोबर रॅपिअर, एअरजेट लूमधारक चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे नुकसान कमी होण्यासाठी रेंदाळ मधील साध्या यंत्रमागधारकांनी १५ दिवस कारखाने बंद तर रॅपिअर व एअरजेट धारकांनी आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योगामध्ये निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे कारखानदार हवालदिल बनला आहे.
शेती खालोखाल रोजगार निर्माण करून देणारा व्यवसाय म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. अन्न, वस्त्र, निवारा पैकी प्रमुख बस्त्र असलेल्या या व्यवसायाला टिकवण्यासाठी शासनाकड वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून वस्त्रोद्योग व्यवसाय वाढावा, उर्जितावस्था यावी यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने म्हणावी तशी मदत केली नसल्याची ओरड यंत्रमागधारकांतून होत आहे. त्यामुळे हा व्यवसाय टिकतो की कालबाह्य होतो याबाबत चर्चेला ऊत आला आहे.

गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व इतर कारणामुळे कापसाचे म्हणावे तसे पिक आले नाही. त्यामुळे गेल्या वर्षी
कापसाच्या दराने उच्चांकी गाठली. यंदाही परिस्थिती त्याचप्रमाणे असून केंद्र शासनाने कापसाला हमीभाव वाढवून दिला असला तरी तो हमीभाव यंदा मिळेल याची शाश्वती नाही. सध्या कापसाच्या दरात चढउतार होत आहेत. तर
त्याप्रमाणेच सुताचे दर कमी जास्त होत आहेत. वीज बिलात प्रति युनिट १ ते सव्वा रूपये वाढ झाली आहे. या परिस्थितीमुळे साध्या यंत्रमागधारकांची अवस्था बिकट होत चालली आहे.

मोठ्या प्रमाणात धोतीचे उत्पादन घेणाऱ्या रेंदाळ येथील यंत्रमागधारकांना विविध कारणामुळे तसेच कापडाला दर व मागणी नसल्यामुळे आर्थिक नुकसानीत
राज्य सरकारने वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था आणण्यासाठी नविन धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या आहेत. मात्र सध्या राज्यातील राजकीयस्थिती गोंधळाची असून सध्या राज्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीचे सरकार आहे त्यामुळे खांदेपालटाची शक्यता आहे. नामदार पाटील यांच्याकडील वस्त्रोद्योगखाते दुसऱ्यांना दिले तर नविन वस्त्रोद्योगधोरणाबाबत पुन्हा श्री गणेशा करावा लागेल. त्यामुळे संपूर्ण वस्त्रोद्योगामध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

व्यवसाय सुरू करीत आहेत. सदरचे नुकसान कमी व्हावे यासाठी रेंदाळ मधील यंत्रमागधारकांनी १५ दिवस आपले कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला कारखानदारांनी उत्स्फुत पाठींबा दिला आहे. व्यवसायातील परिस्थिती जैसे थे राहील्यास बंद कालावधी वाढवण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. इचलकरंजी शहर परिसरात साधे यंत्रमागधारक वेगवेगळ्या क्वॉलिटीचे कापड उत्पादन करीत असल्यामुळे काही प्रमाणात तग धरून आहेत. मात्र रॅपिअर, एअरजेट व ॲटोलूमला म्हणावी तशी मजुरी मिळत नसल्याने + अँटोलूमधारक आर्थिक अडचणी आहे. त्यामुळे या अँटोलूमधारकांनी आठवड्यातून एकदिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंत्रमाग व्यवसायातील अशी परिस्थिती पाहता कारखानदार हवालदिल बनला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -