ताजी बातमी ऑनलाईन टीम
राधानगरी : राधानगरीधरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. काल रात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाजवळ पाणी लागले. पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
आज दुपारी चार पर्यत ८२ मी. मी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १७९१ मी. मी नोंद करण्यात आली आहे. पाणी पातळी ३३६.५५ फूट व पाणीसाठा ६४२७. ६६ द. ल. घ. फू (६.१५ टी एम सी ) इतका झाला आहे. सध्या धरण ७५ टक्के भरले असून. खासगी जलविद्युत केंद्रातून १४०० क्यूसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्यावतीने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थितीची शक्यता आहे.
कोल्हापुरातील राधानगरी धरण ७५ टक्के भरले, १४०० क्यूसेकने विसर्ग; स्वयंचलित दरवाजाजवळ आलं पाणी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -