Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरकरांना दिलासा, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद

कोल्हापूरकरांना दिलासा, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सध्या वीज गृहातून १४०० क्युसेका पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे.

दरम्यान भोगावती नदीवरील पडळी व पिरळ पुलावरील पाणी ओसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. सध्या धरणात ३४६.६४ फूट इतकी पाणी पातळी असून ८१९६.७४ दलघफु इतका पाणीसाठा आहे. शुक्रवारी (दि. २८ ) पहाटे चार वाजता ३ क्रमांकाचा दरवाजा बंद झाला. सकाळ पासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे गेट नंबर ४ व ७ क्रमांकाचे दरवाजे ८.०० वाजता, तर ५ व ६ क्रमांकाचा दरवाजा ८. १५ आणि ८.१६ वाजता बंद झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -