Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगखुशखबर! Amazon फेस्टिवलमध्ये मिळणार बंपर ऑफर, या दिवसापासून खरेदीला होणार सुरुवात

खुशखबर! Amazon फेस्टिवलमध्ये मिळणार बंपर ऑफर, या दिवसापासून खरेदीला होणार सुरुवात

अॅमेझॉन हे ऑनलाईन खरेदीसाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे. खूप लोक ऑनलाईन खरेदीसाठी अॅमेझॉनला प्राधान्य देतात. अॅमेझॉन नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असतो.अॅमेझॉनचा नवीन सेल लवकरच सुरु होणार आहे.

ऑनलाईन गोष्टी खरेदी करणारे ग्राहक नेहमीच सेलची वाट पाहत असतात. पुढच्या महिन्यापासून सणसमारंभाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अॅमेझॉन नवीन सेल घेऊन येणार आहे. ज्यात ग्राहकांना भरभरुन डिस्काउंट आणि ऑफर मिळणार आहे.

Amazon India ने आपल्या नवीन सेलची घोषणा केली आहे. येत्या महिन्यात स्वातंत्र्य दिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर अॅमेझॉनवर सेल सुरु होणार आहे. Amazon Great Freedom Festival सेल येत्या ५ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या कालावधीत असणार आहे. तुम्ही जर प्राइम सदस्य असाल तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी पहिली पसंती देण्यात येईल.

1. अॅमेझॉन सेलची वैशिष्ट्ये

सेलची सर्व माहिती अॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. ग्राहकांना SBI क्रेडिट कार्डवर १०% सूट मिळणार आहे. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत मिळतील. अॅमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना अनेक स्मार्टफोनवर ४०% सूट मिळणार आहे. स्मार्टफोनची ही ऑफर Samsung, One Plus , Realme आणि इतर ब्रॅण्डवर उपलब्ध असेल.

जर स्वस्त दरात लॅपटॉप किंवा इअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहावी लागेल. अॅमेझॉन टीझर पेजनुसार, लॅपटॉप, इयरफोन, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर ७५% पर्यंत सूट मिळेल.

2. टीव्ही आणि फ्रिजवर आकर्षक ऑफर

तुम्हाला टॅबलेट आणि Apple च्या वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तूम्ही अॅमेझॉनवरुन स्मार्ट टीव्हीदेखील स्वस्त दरात खरेदी करु शकतात. 4K टिव्हीवर ६०% पर्यंत सूट मिळेल. याशिवाय वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि इतर उपकरणांवर आकर्षक ऑफर मिळतील. अॅमेझॉनने अद्याप विक्री संबधीत सर्व ऑफर जाहीर केल्या नाहीत. परंतु या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफर मिळतील अशी शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -