Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगबारा फूट ओढ्यात कार कोसळून दोन मित्र ठार; क्षणार्धात दोन्ही कुटुंबांच्या स्वप्नांचा...

बारा फूट ओढ्यात कार कोसळून दोन मित्र ठार; क्षणार्धात दोन्ही कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा, लहान बहिणीचा आक्रोश मन हेलावणार

वेगात असलेली मोटार काल सकाळी सुमारे बारा फूट ओढ्यात कोसळून अनफ खुर्द (ता. भुदरगड) येथील दोन तरुण ठार झाले तर एक जखमी झाला. गारगोटी-पाटगाव मार्गावर सकाळी साडेअकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला.यामध्ये दोघे तरुण ठार झाले. एक जखमी आहे. आदिल कासम शेख (वय १९), झहीर जावेद शेख (१९) अशी मृतांची नावे आहेत. साहिल मुबारक शेख (२०) जखमी झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे अनफ खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत गारगोटी पोलिसांनी (Gargoti Police) दिलेली माहिती अशी ः अनफ खुर्द (ता. भुदरगड) येथील आदिल शेख मोटारीने (एम. एच. १२ – के. जे. ६५५०) दोन मित्रांसह कोल्हापूरला कामानिमित्त निघाला होता. अनफ खुर्द-दासववाडीदरम्यान उकीरभाटले फाट्याजवळ मोटार आली.

तेथील ओढ्यावरील पुलाजवळ आल्यावर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले.यामुळे मोटारीसह तिघेजण खोल ओढ्यात पडले. यामध्ये झहीर शेख जागीच ठार झाला तर आदिल शेखचा उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जात असताना मृत्यू झाला. जखमीला गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती समजताच काही ग्रामस्थ मदतीसाठी धावून गेले. ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. कासम शेख यांचा आदिल एकुलता एक मुलगा होता. तो, हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. ते, आठवड्यापूर्वी सुटीला गावी आले आहेत. अपघातात मुलग्याचा मृत्यू झाल्याचे समजताच आई-वडिलांनी केलेला आक्रोश मन सुन्न करणारा होता. झहीर गारगोटी येथे कापड दुकानात काम करत होता.दोन्ही कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडाअनफ खुर्द गावातील अनेक लोक कामानिमित्ताने परदेशी आहेत. याच गावातील आदिल आणि झहीर लांबचे नातेवाईक

. बालपणापासून एकत्र खेळणारे, बागडणारे जिवलग मित्र. दोघेही शालेय व महाविद्यालयीन शिक्षण एकत्रच घेत होते. दोघांची घरे जवळजवळच. दोघेही गावाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे. आजच्या दुर्घटनेने सारा गाव दुःखात बुडाला. दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा मन हेलावणारा होता. आदिलचे वडील दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत आहेत. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. आपल्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंट करावे आणि भविष्यात याच व्यवसायात उतरावे, असे त्यांचे स्वप्न होते; पण आज क्षणार्धात त्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. आदिलच्या आई-वडिलांनी, लहान बहिणीने फोडलेला हंबरडा मन सुन्न करणारा होता.झहीरच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबातील जबाबदार मुलगा म्हणून आई मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत होती. तो, गारगोटी येथील कापड दुकानात काम करत आपल्या कुटुंबाला आधार देत होता. आज त्याच्या जाण्याने, कुटुंबाचा आधारच गेला. कुटुंबीयांचा आक्रोश मन

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -