Sunday, August 3, 2025
Homeसांगलीसांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

प्रधानमंत्री पीकविमा योजनेतर्गंत जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार ०३८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा घेतला असून ८२,८९४ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे. परंतु विमा भरण्यासाठी सर्व्हरचा अडथळा येत असल्याने शेतकऱ्यांना विमा घेण्यासाठी अडचणी येत आहेत.त्यामुळे मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजना सुरु केली आहे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या जनजागृती केली असल्याने शेतकरी पीक विमा भरण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांनी भात, खरीप ज्वारी, बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा विमा घेऊन पिकांना संरक्षण दिले आहे.जिल्ह्यातील शेतकरी विमा अर्ज करण्यासाठी महाईसेवा केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्रे यासारख्या सुविधा केंद्रांचा आधार घेत आहेत. याठिकाणी गर्दी होत आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी मोबाइलच्या माध्यमातून अर्ज करत आहेत. परंतु सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरण्यास अडथळे येत आहेत.

त्यातच ई पीक पाहणी ॲपवर पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. तरच विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी विमा भरतानाच ई पीक पाहणी ॲपवर पिकाची नोंदही करु लागला आहे. जिल्ह्यात आज अखेर १ लाख ५१ हजार ०३८ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला असून ८२ हजार ८९४ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे.सर्वाधिक पीकविमा जत तालुक्यात

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून सर्वाधिक ८३ हजार ७८९ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी ५२ हजार ०५६ हेक्टरवरील पिकांचा विमा घेतला आहे. तर शिराळ तालुक्यातून ६४५ शेतकऱ्यांनी अर्ज करुन १९१ हेक्टरवरील पिकांना विमा घेऊन संरक्षण दिले आहे. शिराळा तालुक्यातून सर्वात पीकविम्यासाठी कमी अर्ज दाखल केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -