Thursday, February 6, 2025
Homeनोकरीजिल्हा परिषदेतील 19,460 जागांसाठी मेगाभरती! असा करा अर्ज

जिल्हा परिषदेतील 19,460 जागांसाठी मेगाभरती! असा करा अर्ज

राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांची ही भरती होणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात काढण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी एक हजार जागा सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गात सरळसेवा भरती होणार आहे. त्यासाठी २५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारीच यासंदर्भात माहिती दिली होती.

सा करावा अर्ज

जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

जिल्हा परिषद भरतीसाठी दलाल बाहेर फिरत आहेत. त्या आमिषाला बळी पडू नका. ही प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. पैसे देऊन मार्क वाढणार नाहीत, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. गेल्या काळात काही परीक्षा झाल्या. तेव्हा पेपर फुटले, डमी विद्यार्थी बसले, उत्तर पत्रिकेत घोटाळा झाला, टीईटीमध्येही घोटाळा झाला, आता असे होणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -