गरीब परिवारातील विद्यार्थ्यांना दहावी नंतरचे शिक्षण मिळावे, त्यांना राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी योग्य सोयी सुविधा मिळाव्या यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून एक योजना आखण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे दहावीनंतर तुम्ही शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जात असाल, आणि त्या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी वस्तीगृ ग्रुप जॉईन करा पाल तुम्हाला घाबरून जाण्याचा गरण नाहा. अशावेळी तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ
घेऊ शकता.
स्वाधार योजनेचा उद्देश कोणताच विद्यार्थी
शिक्षणापासून वंचित राहू नये हा आहे. याशिवाय स्वतःचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ होऊ शकतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी असलेले वस्तीगृह पूर्णपणे भरले होते. त्यामुळे काही होतकरू मुलांना वस्तीगृहाचा लाभ घेता येत नाही. अशा वेळेस स्वाधार योजना कामात येऊ शकते. या योजनेअंतर्गत दहावी, बारावी, पदविका अभ्यासक्रमांसाठी राज्य
व्यावसायिक
सरकारकडून 51 हजारांची रक्कम दरवर्षी
देण्यात येते.
या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, नव बौद्ध धर्मातील विद्यार्थी यांना या योजनेचा लाभ मिळतो. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपये पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे . तसेच स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याशिवाय मागच्या वर्गामध्ये या विद्यार्थ्यांना 60% मार्क्स आणि दिव्यांग असाल तर तुम्हाला 40 टक्के मार्क असणे गरजेचे आहे.
स्वाधार योजने मध्ये Yojana) बोर्डिंग सुविधेसाठी 28 हजार, रहिवासी सुविधेसाठी 15000, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 5000 रुपये, आणखीन वेगळा खर्च 8000, दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 2000 या पद्धतीने 51000 रुपये स्वाधार योजनेतून मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट
आधार कार्ड
मोबाईल नंबर
ग्रुप जॉईन करा
पासपोर्ट फोटो
ओळखपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
परीक्षेच्या निकालाची प्रत
विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या बाबतचे
प्रमाणपत्र
अशाप्रकारे भरा अर्ज
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील फॉर्म भरू शकतात.
1) सर्वात आधी महाराष्ट्र समाज कल्याण
विभागाच्या
वेबसाईटवर
जा.
https://sjsa.maharashtra.gov.in/
2) त्यानंतर होम पेज उघडेल.
3) होम पेजवर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म pdf ची लिंक दिसेल.
4) त्या लिंक वर ग्रुिप जॉईन करा पीडीएफ फॉर्म उघडेल.
5) हा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट
काढा.
6) प्रिंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी दिलेली सर्व माहिती भरा.
7) या अर्जासोबत लागणारे सर्व कागदपत्रे जोडा.
8) तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे जाऊन यानंतर हा फॉर्म सबमिट करा.
9) तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सरकारकडून तुमच्या बँक खात्यावर स्वाधार योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येतील.
अधिकृत
वेबसाईट
https://sjsa.maharashtra.gov.in/