सतत हवामानात बदल (Change In Climate) होताना दिसत आहे. हे हवामान बदल माणसांच्या गैर कृत्यामुळे होत असून पृथ्वीचे तापमान यामुळे प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोडी, सिमेंटची जंगल या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. आणि यामुळे हवामान बदल होत आहे. हे हवामान बदल मानवी आयुष्याला प्रचंड धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
हवामान बदलाचा परिणाम फक्त मानवी जीवनावरच नाही तर समुद्रातील प्राण्यांवर, प्रजातींवर, पशु पक्षांवर देखील दिसून येईल. सध्या कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनाचा प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे तापमानात देखील वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, हवामान बदलामुळे पुढील शकतात १ अब्ज लोकांचा अकाली मृत्यू होईल असं म्हंटल आहे.
एनर्जी जर्नलने (Energy Journal) हवामान बदलामुळे पुढील शतकात एक अब्ज लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो असे सांगितले आहे. संपूर्ण जगात तापमान वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून दिवसेंदिवस हे तापमान प्रचंड वाढत आहे. सध्याच्या काळात जागतिक तापमानामध्ये दोन अंश सेल्सिअस ने वाढ झाली तर पुढच्या शतकात एक अब्ज लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. असं एका संशोधनातून समोर आले आहे.
त्यानुसार एका संशोधकाने सांगितलं की, हवामान बदलासाठी तेल आणि वायू उद्योग 40% पेक्षा जास्त प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन करण्यास जबाबदार आहे. या उत्सर्जनाचा परिणाम जगातील सर्वात दुर्बल आणि कमजोर व्यक्तींवर अब्जावधी लोकांच्या जीवनावर होऊ शकतो.
या संशोधनामध्ये सहभागी असलेले कॅनडातील वेस्टर्न विद्यापीठाचे प्रोफेसर जोशुआ पीयर्स यांनी सांगितलं की, हवामान बदल रोखण्यासाठी तातडीने काम करण्याची गरज आहे. भविष्यात होणारे प्रचंड नुकसान कमी करण्यासाठी तसेच मानवी जीवन वाचवण्यासाठी जीवाश्म इंधन शक्य तितक्या लवकर थांबवणे गरजेचे आहे. यासोबतच अक्षय ऊर्जेसाठी जास्त सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
भविष्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही तरी देखील हवामान बदलामुळे भविष्यात दहा पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू शकतो. त्याचबरोबर हे अत्यंत गंभीर असून याबाबत आपल्याला विचार करणे आणि योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. या संशोधनामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यासोबतच सरकार कॉर्पोरेट आणि नागरिकांच्या लेवल वर त्वरित कारवाई करण्यास देखील सांगितले आहे.
हवामान बदलामुळे 1 अब्ज लोकांचा अकाली मृत्यू होणार? नव्या दाव्याने खळबळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -