बॅंकेत नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबरी आहे. ज्यांना नोकरी करायची असेल तर भारतीय स्टेट बॅंकेत ( SBI ) नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत देशभरात सहा हजाराहून अधिक अप्रेंटिसच्या भरतीचे नोटीफिकेशन जारी केले आहे.यासंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रतिक्रीया सुरु झाली आहे. उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 21 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर पाहा काय आहे प्रक्रीया …
एसबीआय अप्रेंटिस भरती 2023 नोटीफिकेशननूसार ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. उमेदवारांना 21 सप्टेंबरपर्यंत किंवा त्याच्या आधीच अर्ज करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. या भरतीद्वारे देशभरात बॅंकात एकूण 6160 रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवार आधिकारिक वेबसाइट्स nsdcindia.org/apprenticeshiphttp://nsdcindia.org/apprenticeship या apprenticeshipindia.orghttp://apprenticeshipindia.org किंवा bfsissc.comhttp://bfsissc.com किंवा Bank.sbi/careershttp://Bank.sbi/careers किंवा www.sbi.co.inhttp://www.sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतील.
एसबीआय अप्रेंटिस नोटीफिकेशनची तारीख : 31 ऑगस्ट 2023
एसबीआय अप्रेंटिस अर्जाची सुरुवात: 01 सप्टेंबर 2023
एसबीआय अप्रेंटिस अर्जाची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023
एसबीआय अप्रेंटिस परीक्षेची तारीख : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023
कोण आहे पात्र पाहा
एसबीआय अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा संस्थेतून ग्रॅज्युएट करायला हवे. तसेच उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2023 रोजी किमान 20 तर कमाल 28 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गाला वयाची सुट दिली जाईल. अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
निवड प्रक्रीया काय आहे
एसबीआय अप्रेंटिस भरती 2023 ची निवड प्रक्रीया गेल्या भरती मोहीमेसारखीच आहे. उमेदवार लेखी परीक्षा आणि स्थानिय भाषेत परिक्षा पास करुनच नोकरी मिळण्यास प्राप्त ठरतील. ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर / नोव्हेंबर मध्ये आयोजित केल्या जातील. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरउमेदवाराला मेडीकल टेस्टसाठी हजर व्हावे लागेल.
भारतीय स्टेट बॅंकेत सहा हजाराहून अधिक पदांची भरती, ग्रॅज्युएट तरुणांना चांगली संधी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -