Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरआज कोल्हापूर बंदची हाक

आज कोल्हापूर बंदची हाक


जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकावर करण्यात आलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी (५ सप्टेंबर २०२३) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना आंदोलकावर लाठीमार करण्याचा प्रकार चुकीचा आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाने केले आहे. जालना येथे मराठा आंदोलकावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात सोमवारी सकल मराठा समाजातर्फे जवाब दो आंदोलन पुकारण्यात आले होते. दसरा चौक येथे झालेल्या या आंदोलनाला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी राज्य सरकारवर टीका करण्यात आली.
कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांना पाच सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त | केशव जाधव यांनी सुट्टी जाहीर केली आहे. संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे विद्यार्थी वाहतूक व्यवस्था बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करुन प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आहेत असे म्हटले आहे.

तसेच मंगळवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदमध्ये व्यावसायिक व दुकानदारांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. सकल मराठा समाजाची वसंतराव मुळीक यांनी घटनेचा आढावा घेतला.

भजन करणाऱ्या मराठा समाजातील लहान मुले आणि महिलांवर जो लाठीमार करण्यात आला त्याचा निषेध केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कोल्हापूर शहर बंद करण्याची सूचना केली. त्यास उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आणि मंगळवारी कोल्हापूर बंद यशस्वीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.


या बंदमध्ये व्यापारी, उद्योजक, विक्रेते, वाहनधारक संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शशिकांत पाटील, गणी आजरेकर, कादर मलबारी बाबा पार्टे बाबा इंदुलकर, बाबा देवकर, शारंगधर देशमुख, अर्जुन माने, मोहन सालपे, दिलीप देसाई, जयकुमार शिंदे, दिगंबर फराकटे, सुशील बांदिगिरे, विजय सावंत, दुर्वास कदम, संदीप देसाई आदींचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -