Saturday, July 27, 2024
Homeइचलकरंजीसकल मराठा समाजाच्यावतीनेबुधवारी इचलकरंजी बंदची हाक!

सकल मराठा समाजाच्यावतीनेबुधवारी इचलकरंजी बंदची हाक!

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांवर लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विविध न्याय मागण्यांसाठी इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार ६ सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे अध्यक्ष पै. अमृत भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन सुरु होते. या आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार करत आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (६ सप्टेंबर) इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा आरक्षण संदर्भातील आंदोलनाकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा समाज एकवटला असून पुन्हा एकदा रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज झाला आहे. मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण मिळावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करुन निधी वर्ग करावा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु झाले आहे.

बुधवारी सकाळी ९ वाजता राजर्षि शाहु महाराज पुतळा येथून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. तर संपूर्ण दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता इचलकरंजी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये इचलकरंजी शहरातील सर्वच नागरिक, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून या बंदला पाठींबा द्यावा, असे आवाहन पै. अमृत भोसले यांनी केले आहे.

यावेळी प्रकाश मोरे, पुंडलिकभाऊ जाधव, मोहन मालवणकर, अमरजित जाधव, अरविंद माने, भारत बोंगार्डे, संतोष सावंत, नागेश पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -