Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनपरिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लग्न पत्रिका व्हायरल, लग्नाची तारीख, ठिकाण,...

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लग्न पत्रिका व्हायरल, लग्नाची तारीख, ठिकाण, वाचा सर्वकाही

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी दिल्ली येथे अत्यंत शाही पद्धतीने साखरपुडा हा पार पडलाय. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अत्यंत खास लोकांना निमंत्रण होते. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपल्या कुटुंबियांसोबत सहभागी झाले. इतकेच नाही तर परिणीती चोप्रा हिची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील या साखरपुड्यामध्ये सहभागी झाली.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सर्वात अगोदर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मुंबईमध्ये स्पाॅट केले गेले. तेंव्हापासूनच यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही सतत रंगत होती.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यानंतर चाहते हे यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न राजस्थान येथे पार पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर एक कार्ड परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे सध्या तूफान व्हायरल होताना दिसतंय.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबर रोजी पंजाबी रीतिरिवाज पार पडेल. विशेष म्हणजे आता हे देखील स्पष्ट झाले आहे की, यांचे लग्न हे राजस्थानमध्येच पार पडणार आहे. 30 सप्टेंबरला चंदीगडमध्ये रिसेप्शन होणार असल्याचे व्हायरल होणाऱ्या कार्डमध्ये दिसत आहे.

याबद्दल अजून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्याकडून काही सांगण्यात नाही आले. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा हिने साखरपुड्यामध्ये राघव चड्ढा याच्यासाठी खास गाणे गायले होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यामधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे काही दिवसांपूर्वीच उज्जैन येथे मंदिरात दर्शन करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे राजस्थानमध्येही गेले होते. सध्या सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -