तळ्याच्या काठी वाढदिवस (Birthday) साजरा करण्याच्या कारणावरून उचगाव (ता. करवीर) येथे दोन गटांत दगड आणि काठ्यांनी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांचे दहा जण जखमी झाले. दोन्ही गटांतील १३ जणांवर गुन्हा दाखल झाला.
ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मारुती कृष्णा वडर (वय २०, रा आंबेडकर चौक, उचगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उचगाव गावतळ्याजवळ मारुती आपल्या मित्रांसोबत दिनेश गस्तेचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी तळ्याजवळ राहणारे मिलिंद महेश पोवारसह आठ जणांनी येथे वाढदिवस साजरा करू नका असे दरडावत शिवीगाळ करत काठीने मारहाण केली.
त्यामध्ये मारुती कृष्णा वडर, रोहित तिवडे, विश्वनाथ बिरांजे, पप्पू अवघडे, विनोद चौगुले, मनोज चौगुले, (सर्व रा .उचगाव) हे जखमी झाले. याबाबत संशयित आरोपी मिलिंद महेश पोवार, शैलेश दगडू पोवार, सुजय नंदकुमार पोवार, देवा पोवार, जयश्री पोवार, दिपाली पोवार, अमृता पोवार, मयुरी पोवार (सर्व रा उचगाव) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान देवांग महेश पोवार (रा. साई पंपाच्या मागे उचगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोज महेश चौगुले हा आपल्या मित्राचा दहा ते बारा सहकाऱ्यांसमवेत वाढदिवस साजरा करत होता. त्यावेळी दंगा आणि शिवीगाळ सुरू होती. त्यावेळी मिलिंद महेश पोवारने तुम्ही येथे शिवीगाळ करू नका, आमच्या घरी महिला राहतात असे खडसावले. त्याचा राग मनात धरून मनोज चौगुलेने तुझा काय संबंध असे म्हणत शिवीगाळ करत तो आणि त्याच्या मित्रांनी दगड आणि काठ्यांनी मारहाण केली.
त्यामध्ये मिलिंद महेश पोवार, अमृता महेश पोवार, मयुरी शैलेश पोवार, उमा महेश पोवार, शैलेश दगडू पोवार (रा आंबेडकर चौक, उचगाव) जखमी झाले. त्यावरून मनोज महेश चौगुले, मारुती कृष्णात वडर, बबल्या चौगुले, रोहित अशोक तिवडे, विश्वनाथ देवानंद बिरांजे (सर्व रा. आंबेडकर चौक, उचगाव) यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात (Gandhinagar Police Station) गुन्हा नोंद झाला.
उचगावात दोन गटांत तुफान हाणामारी; १३ जणांवर गुन्हा दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -