इचलकरंजी, शहरात वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणारे तसेच शाळा, कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतुक शाखेच्यावतीने कारवाई केली. त्यामध्ये तब्बल १८८ वाहनधारकांकडून १ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसुल केला.
इचलकरंजी वाहतुक शाखा तसेच दंगल नियंत्रण पथक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये शहर परिसरात व शाळा कॉलेज, महाविद्यालय परिसरात भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, विना नंबर प्लेट वाहन चालविणे, सीट बेल्ट न वापरणे, सायलेंसरमध्ये फेरफार करणे, सिग्नल जंप करणे, वन वे मधुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. सपोनिराजीव पाटील व वाहतुक शाखेने कारवाई केली.
नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई ; सव्वा लाखाचा दंड वसुल Ichalkaranji News
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -