१० वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जर तुम्हालाही सरकारी खात्यात काम करण्याची इच्छा असेल तर तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.पूर्व रेल्वे अंतर्गत ३११५ पदांसाठी भरतीची जाहीरात करण्यात आली आहे. प्रक्रियेनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. कसे कराल अर्ज शेवटची दिनांक कधी जाणून घेऊया.Application) करण्याची शेवटची तारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख २७ सप्टेंबर २०२३
२६ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.Education) पात्रता
उमेदवारांने मान्यताप्राप्त विद्यापिठातून १० वी परीक्षा किंवा १२ वीत किमान ५० टक्के गुणांसह पास झालेले असावे.
तसेच NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.3. वयोमर्यादा किती?
उमेदवाराचे वय (Age) हे १५ ते २४ वर्ष असायला हवे.
4. कसा कराल अर्ज?
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत साइट्सला भेट देऊ शकता.