तब्बल दोनशे वर्षांची परंपरा आणि पर्यावरणपूरक मूर्ती असलेल्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या ‘चोर’ गणपतीची आज (16 सप्टेंबर) पहाटे प्रतिष्ठापना करण्यात आली. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून सांगलीच्या (Sangli Ganesh Darshan) गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती विशेष करून प्रसिद्ध आहेत. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला तब्बल 200 वर्षांची परंपरा आहे. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती
पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भक्त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला “चोर गणपती’ म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे. गणेशचतुर्थीच्या आधी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते. दरवर्षी रंगरगोटीशिवाय मूर्तीना हात लावला जात नाही. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात. पटवर्धन संस्थानाच्या श्री गणपती पंचायतन मंदिरातील श्री चोर गणपती
गणपती मंदिरातील मुख्य गणपतीच्या गर्भगृहाबाहेर दोन्ही बाजूला या प्रकारच्या दोन गणपतींची भाद्रपद शुध्द प्रतिपदेला विधीवत स्थापना होते. भाद्रपद शुध्द पंचमीला म्हणजेच ऋषीपंचमीला यांचं विसर्जन होतं. मुर्त्या जवळपास 150 वर्ष जुन्या आणि लगद्यापासून बनवलेल्या असल्याने उत्सवानंतर पुन्हा सुरक्षित जागी ठेवल्या जातात. हा गणपती गुपचूप येऊन कधी बसतो आणि केव्हा जातो कळतही नाही त्यामुळे याला चोर गणपती म्हणलं जातं. विशेष असा इतिहास या गणपतींना नसला तरी चोर गणपती बसल्यावर वातावरण गणेशमय होऊन जातं. सर्वच पटवर्धन सरकार गणेशभक्त असल्याने गणेशोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा होतो.गणपती मुख्य मंदिरात बसतात. चतुर्थीला दरबार हॉलमध्ये प्रथेनुसार पार्थीव विग्रहाची प्रतिष्ठापना होते. तो उत्सवही पारंपारीक मिरवणुकीने पाचव्या दिवशी समाप्त होतो.