Thursday, July 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात दुपारपर्यंत ८५ गणेश मूर्तीचे विसर्जन!

कोल्हापुरात दुपारपर्यंत ८५ गणेश मूर्तीचे विसर्जन!

  • कोल्हापुरात रंकाळा येथील इराणी खणीत गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत लहान-मोठे अशा एकूण ८५ गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर पोलीस दल, कोल्हापूर गृहरक्षक दल, व्हाईट आर्मी यांच्या सहकार्याने येथील इराणी खणीत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या वतीने गणेश मुर्त्या इराणी खणीतील मध्यवर्ती भागात विसर्जित करण्यासाठी चार तराफे सुसज्ज ठेवले आहेत. कुशल मनुष्यबळ कार्यरत आहे. यासह खणीच्या दोन्ही बाजूस अद्ययावत दोन जेसीबी ११ ते २१ फुटी गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी सज्ज आहेत.

माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि मित्र परिवारातर्फे या ठिकाणी सर्व गणेशोत्सव मंडळाना निरोपाचे नारळ दिले जात आहेत. सकाळी ९ वाजता खासबाग येथून सुरू झालेल्या शिस्तबद्धपणे इराणी खणीत विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजेपर्यंत ५५ मोठ्या आणि छोट्या छोट्या ३० गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -