कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दैनंदिन विमानसेवा पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्टार एअर कंपनीकडून (Star Air Company) आज नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी बंगळूरहून कोल्हापूरकडे विमान उड्डाण घेईल आणि १० वाजून २० मिनिटांनी विमान कोल्हापूरला येईल. त्यानंतर १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान मुंबईत ११ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. तर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान कोल्हापुरात ४ वाजून ४० मिनिटांनी पोचेल.तेच विमान ५ वाजून १० मिनिटांनी बंगळूरला रवाना होईल. दैनंदिन विमानसेवा सुरू झाल्यामुळे, कोल्हापूरच्या उद्योग पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या ही विमानसेवा आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरूवार व शनिवार या चार दिवशी आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -